हरियाणा येथे होऊ घातलेल्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा मध्ये महाराष्ट्रचे मुला व मुलीचा संघ भाग घेणार आहेमहाराष्ट्र सॉफ्टबॉल संघामध्ये यवतमाळ येथे राहणारे नयन गोपाल मांढरे याची निवड झालेली आहे नुकताच धुळे येथे राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजित झाले होते तेथे यवतमाळच्या सॉफ्टबॉल संघाने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत पुणे जिल्हा, अकोला जिल्हा व जळगाव जिल्हा या तिन्ही संघाला पराभूत करून क्वार्टर फायनल ला नाशिक संघासोबत पराभव स्वीकारला वरील सगळ्या मॅचेस मध्ये नयन ने उत्कृष्ट प्रदर्शन दाखविला.राज्यस्तरीय स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये नयन गोपाल मांढरे याचे नाव सातव्या नंबर वर होते9 जानेवारी ते 12 जानेवारी हरियाणा इथे होऊ घातलेल्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी नागपूर इथून महाराष्ट्राचा सॉफ्टबॉल संघ रवाना झालेला आहेनयन ला यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रा. विकास टोने यांनी त्याच्या महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा दिले व तसेच शारीरिक शिक्षक पंकज शेलकर,पियुष चांदेकर निशांत सायर, सूरज घोड़े, प्रीतम यादव, साहिल मोहम्मद, भाकीत मेश्राम , यांनी नयनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४






Leave a Reply