केंद्राकडून मिळणारा निधी असो वा विविध योजना असोत, ममता विरुद्ध भाजप असा लढा टोकाला जात आहे
कोलकात्यात आय-पीएसी कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाचे (ED) छापे आणि त्यातून या संस्थेचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी उडालेला संघर्ष, येत्या काही महिन्यांत त्या राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची नांदी मानला जातो. यंदाच्या या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून बंगालची सत्ता हिरावून घेण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे. महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आणि बिहारपाठोपाठ हे महत्त्वाचे राज्य जिंकण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी ईडी या केंद्रीय संस्थेचा वापर दिल्लीकडून होत असल्याची ममता सरकारची भावना आहे. बंगाल आणि तमिळनाडूतील अलीकडच्या घटना या दोन राज्यांच्या निवडणूककेंद्री राजकारणाशी थेट निगडित आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच तमिळनाडूत एम.के.स्टॅलीन भाजपला वरचढ होऊ देणार नाहीत.








Leave a Reply