जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील गिट्टीखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्रातील एका घोड्यावरच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी सुरज उर्फ छोटा सुंदर खोब्रागडे, वय 30 वर्ष, रा. मानवता नगर, गिट्टीखदान, याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 17 मे रोजी रात्री घडल्याची माहिती आहे. ‘डिस्ट्रीक्ट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन द हॉर्स रायडिंग अकादमी’, टीव्ही टॉवरजवळ असलेल्या परिसरात आरोपीने चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी प्रवेश केला. त्यावेळी अकादमीत 17 घोडे होते. त्याने तिथून साधारण दोन हजार रुपये किमतीचे चार लोखंडी अँगल चोरले. चोरी करतानाच त्याचं लक्ष एका घोड्याच्या पिल्लाकडे (शिंगरु) गेलं आणि छोटूने त्याला वासनेचा बळी बनवत त्यावर विकृत, अनैसर्गिक कृत्य केले.
Leave a Reply