( विदर्भ लाईव्ह न्यूज ब्युरो ) काल झालेल्या मुसळधार पावसाने जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने स्थानिक यवतमाळ येथील, सुराणा लेआउट मधील नाल्याच्या कडेला असलेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरावरील टिन पत्राचे छत अंगावर कोसळले. अत्यंत काबाळकष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या उत्पन्नाच्या रुपया न रुपया जोडून एक छोटसं अंगावर छत असलेलं घर तयार केलं त्या माऊलीचे नाव मालाबाई मुकिंदा गजभिये वय वर्षे ७८. छोट्याशा घरट्यात कशीबशी जीवन जगत होती. तेवढ्यात काल निसर्ग कोपला व सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात घरावरील छत तसेच छत्रीसारखे गोल घुमट होऊन अंगावर कोसळले हे कल्पनाच केलेले बरे. सुदैवाने शेजारच्या लोकांच्या सतर्कतेमुळे वयोवृद्ध माय माऊलीचा जीव तेवढा वाचला. परंतु झोपण्यास सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही. पूर्णपणे घर उध्वस्त झाले. वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांनी तात्काळ यवतमाळ चे तहसीलदार योगेश देशमुख यांना माहिती दिल्याबरोबर त्यांचे कर्मचारी विलंब न करता घटनास्थळी पोहोचले व त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचनामा केला. यावेळी यवतमाळ चे तहसीलदार योगेश देशमुख यांची तत्परता खरंच सामाजिक सेवेची जाण असल्याची प्रचिती देत होती. यावेळी शासनाच्या उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांनी आश्वत केले नैसर्गिक आपत्ती मधून जेवढी शक्य होईल तेवढी मदत नक्कीच केल्या जाईल. परंतु आता घरटं बनवायचं कसं, त्याला उभारायचं कसं, हा प्रश्न त्या वयवृद्ध माय माऊली समोर येवुन ठेपला आहे.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply