स्थानिक यवतमाळ येथील, अमलोकचंद महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेला रोहित उमेश मेश्राम हा सॉफ्टबॉल खेळाडू आहे. तो यापूर्वी सुद्धा राज्यस्तरावर खेळलेला असून, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा सुद्धा खेळलेला आहे. अशातच त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर थायलंड येथे बँकॉक मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप चॅम्पियनशिप सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये भारतीय संघात निवड झाली व तो २ जुन ते ७ जुन पर्यंत झालेल्या या स्पर्धेत खेळून सुद्धा आला. ही महाविद्यालयासाठी तसेच यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांडवलकर, यांनी रोहित मेश्राम आंतरराष्ट्रीय खेळाडू सॉफ्ट बॉल हा यवतमाळात येताच महाविद्यालयात बोलवून त्याचा धनादेश व पुष्पगुच्छ देवुन आदर सन्मान केला. यावेळी प्रामुख्याने प्रा. व्ही. सी. जाधव, क्रीडा व शारीरिक शिक्षक संचालक किशोर तायडे, शारीरिक शिक्षक प्रा. संजय पंदिरवाड, प्रा. सनी नागदिवे, हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार विजय बाबू दर्डा, संस्थेचे सचिव प्रकाश चोपडा, यांनी सुद्धा रोहितला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच यवतमाळ चे लोकप्रिय आमदार श्री. बाळासाहेब मांगुळकर यांनी आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात सुद्धा रोहित मेश्राम यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपूर यवतमाळ लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, इत्यादींच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply