यवतमाळ ,17 जून २०२५ : स्थानिक नाठार इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन शिक्षकांसाठी संवाद उपयोगी अश्या संवाद कौशल्य आणि संवाद विकारांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी ,यवतमाळ वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. निता मेश्राम (सुखदेवे) -Audiologist & speech Language Therapist ह्या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्या डॉ. निता मेश्राम (सुखदेवे) यांचा परिचय शाळेचे शिक्षक श्री वृद्धिंत नाठार सरांनी केले. ह्या वेळी डॉ. निता सुखदेने मॅडम ह्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वरग्रंथी संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वरग्रंथीच्या व्यायामासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार सुचविले जसे हळुवार गुणगुणणे, लिप ड्रील आणि मान आणि खांदे ताणणे इत्यादी.ह्या कार्यक्रमासाठी सर्वा शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली व मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका भावना नाठार ह्यांनी आभार मानले.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply