मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. खरंतर ते पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मिश्लिकपणे बोलून गेले. पण त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याशिवाय होणारच नाही. छगन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतही दावा करत आहेत. दावा करणं काय वाईट आहे? मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते काहीही होऊ शकतात. ते तिसरे उपमुख्यमंत्रीदेखील होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे सगळं, कुणाला उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री करायचं”, असं गिरीश महाजन मिश्किलपणे म्हणाले. यावेळी गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर हसू देखील आलं.
Leave a Reply