स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेली छोटीशी वस्ती सुराणा लेआउट, याच सुराणा लेआउट मध्ये वास्तव्यास असलेला रोहित उमेश मेश्राम हा सॉफ्टबॉल खेळाडू बऱ्याच वर्षांपासून सॉफ्टबॉल हा खेळ खेळत आहे. त्याच्या कठोर मेहनतीने अनेकदा राज्यस्तरावर खेळलेला आहे. त्याने जिद्द व चिकाटीने सॉफ्टबॉलचा सराव करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सॉफ्टबॉल संघात जागा मिळविली आहे. नुकत्याच २ जून पासून थायलंड बँकॉक येथे सुरू होणाऱ्या “आशिया कप चॅम्पियनशिप – २०२५” साठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. भारतीय संघात निवड झाल्याने सुराणा लेआउट पाटीपुरा परिसरात समस्त खेळाडूंमध्ये तसेच यवतमाळातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहितची निवड भारतीय संघात होने यवतमाळ साठी आनंदाची व गर्वाची गोष्ट आहे. ही निवड प्रक्रिया महाराष्ट्रातील जळगाव येथील शिबिर, उज्जैन मध्य प्रदेश येथील शिबिर, जळगाव येथील तिसरे शिबिर व नंतर दिल्ली येथील शिबिर यामध्ये पार पडली. विशेष म्हणजे रोहित हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा सॉफ्टबॉल खेळाडू आहे. तो यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. रोहितची कठोर मेहनत व सॉफ्टबॉल या खेळाच्या संबंधाने त्याला सॉफ्टबॉल असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी व वरिष्ठ खेळाडू यांची अत्यंत मोलाची मदत लाभली, त्यामध्ये प्रामुख्याने, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष प्रदीप तळवलकर ( गुरुजी ) सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक, किशोर चौधरी, मंगेश गुडदे, स्वप्निल चांदेकर, प्रितीश पाटील, यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी सचिन हरणे, यवतमाळ जिल्हा असोसिएशनचे डॉ. प्रा. विकास टोने, प्रा. नरेंद्र फुसे, यवतमाळ येथील वरिष्ठ खेळाडू तथा मार्गदर्शक पंकज शेलोटकर, पियुष चांदेकर, इत्यादींनी भरघोस मदत केली. भारतीय सॉफ्टबॉल संघ येणाऱ्या ३१ मे ला दिल्ली येथून बँकॉक थायलंडला रवाना होणार आहे. आशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप यशस्वीरित्या जिंकून येण्यासाठी यवतमाळ येथील क्रीडा प्रेमी व सॉफ्टबॉल खेळाडूंनी रोहित सह भारतीय सॉफ्टबॉल संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply