भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन आणि चंदीगड सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड येथे संपन्न झालेल्या ४३ व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुलांच्या संघान तृतीय पदक प्राप्त केले.चंदीगड राज्याचे मुख्य सचिव राजीव वर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अरुण राघव, रुपलाल शर्मा, माजी खजिनदारश्रीकांत थोरात, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रवीण अनावकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र मुलांच्या संघाला प्रशिक्षक अक्षय येवले, गणेश बेटुदे, कल्पेश कोल्हे, अरुण श्रीखंडे, चेतन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयी संघामध्ये मनन येवतीकर,श्रीराज पाटील, प्रणव जाधव, शंतनु इमने, राज आढाव,रत्नशील डोंगरे, अनोश कांबळे, संभाजी देशमुख, तुषार राठोड, भावेश पाटील, तनिश रामावत, सक्षम गायकवाड,संकेत बावनकर, स्वराज गायकवाड, भैरवेंद्र सैनी, गणेश गवळी आदी खेळाडूंचा समावेश होता.या शानदार यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीश महाजन, सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, डॉ. सुरजसिंग येवतीकर, रमाकांत बनसोडे, आंतरराष्ट्रिय प्रशिक्षक किशोर चौधरी, विकास टोने, रमेश भेंडगिरी आदींनी विजयाबद्दल अभिनंदन केले.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply